सिंगल मेन्यू रेस्टारंट संकल्पना....!

My Sumed | Too Good

सिंगल मेन्यू रेस्टारंट...!

Welcome to the blog of MySumed.com

सिंगल मेन्यू रेस्टारंट संकल्पना...

जर नवीन रेस्टारंट व्यवसायाची संकल्पना तुमच्या मनात असेल आणि पुरेसे भांडवल तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर सिंगल मेनू रेस्टारंट ही संकल्पना एक उत्तम पर्याय ठरू शकेल.
आजकाल हा ट्रेंड वेगाने विकसित होत आहे. अगदी साध्या पोळीभाजी केंद्रापासून ते पिझ्झा शॉप पर्यंत ही संकल्पना विस्तारीत होत आहे.

उदा. लहान विक्री केंद्रावर सध्या पावभाजी, सॅंडवीच, बर्गर, मस्कापाव, डोसा, बिर्याणी, पिझ्झा इ. पदार्थ सर्रास विकले जातात. हे उद्योग अति वेगाने खवय्यांचे लक्ष वेधून घेत असून ते एखाद्या फूल मेन्यू रेस्टारंटला टक्कर देऊ लागले आहेत. अर्थात असे सिंगल मेन्यू उद्योग करत असताना मेन्यूच्या क्वालिटीला महत्व दिले पाहिजे. “जे मी करणार आहे त्याची मला अत्यंत आवड आहे आणि ते मी अतिशय उच्च दर्जाचे करीन.” ही भावना मनात ठेवली पाहिजे. आज काल ग्राहक पदार्थाची चव, गुणवत्ता व स्वच्छता या बाबतीत सतर्क असतात.


वेगाने लोकप्रिय होत असलेल्या या व्यवसायास भांडवल व मनुष्यबळही खूप कमी लागते.

साधारणत: १ लाख ते ६ लाख रुपये भांडवल गुंतवून हा व्यवसाय चालू करता येतो मेन्यू जर तुम्हाला स्वत: बनवता येत असेल तर उत्तम; नाही तर एक कुक ठेवता येईल. सोबत एक किंवा दोन मदतनीस यांची गरज लागेल. ते सर्व लोक क्षेत्रातील अनुभवी व कुशल असले पाहिजेत.
साधारणत: २०० स्क्वे. फूटची जागा किंवा आपल्या घरातही हा व्यवसाय चालवू शकतो. ही सिंगल मेन्यू संकल्पना असली तरी इतर मेन्यू पर्याय व अनुभवाचे बंधन इथे नसते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेब/अॅप्लिकेशन ऑनलाईन ऑर्डर बुकिंग, एसएमएस सेवा, पोस्टर्स, फेसबुक, व्हॉटसअॅप या अत्याधुनिक माध्यमाचा वापर करून मार्केटींग करता येईल. या व्यवसायामधून दररोज किमान ४ ते ९ हजारापर्यंत, ३० ते ३५ टक्के निव्वळ नफा कमवता येतो.

या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर काही गोष्टींना जास्त महत्व दिले पाहिजे. व्यवसायाची जागा स्वच्छ, निरोगी असावी. मेन्यू चविष्ट, ताजा आणि उच्च गुणवत्तेचा असला पाहिजे. उच्च प्रतिचे व्यवसाय तंत्र आत्मसात केले पाहिजे. उच्च प्रतिचे ब्रॅंडींग व मार्केटींग कौशल्य स्वत:मध्ये विकसित करून व्यवसायाच्या गुणवत्तेत सातत्य ठेवले पाहिजे. चांगल्या साधन सामग्रीचा वापर करून मेन्यूची गुणवत्ता कायम ठेवून लोकांपर्यंत उत्कृष्ट सेवा पोहचवणे ही काळाची गरज आहे. तरच आपला व्यवसाय यशस्वी होईल व दीर्घकाळ टिकेल. व्यवसाय तो नसतो जो दीर्घ काळ चालू शकतो.... तर व्यवसाय तो असतो ज्याला प्रत्येक अडचणीत तूम्ही चालवु शकता। रेस्टॉरन्ट, खानावळ यामध्ये चवेवर (टेस्ट वर ) खेळ असतो आणि प्रत्येकाची एकच चव असेल असे नाही परंतु एकाच पदार्थांचे अनेक प्रकारात रुपांतर करता येते जसे काही उदाहरणाद्वारे समझाल ओमकार नगर चौकातील संतोष पकोडे वाला , बजाज नगर चौकातील 30 प्रकारची खिचडी बनवनारा, लक्ष्मी नगर चौकातील अद्रक+लसुन+हीरवीमीर्ची वाला चहा प्यायला लोक सक्करधरा वरून जातात कारन सिंगल मेनु असूनही त्यांनी आपल्या विशिष्ट पद्धतीने स्वताची ओळख तयार केली आहे ।
यासंदर्भात अधिक माहिती करीता संपर्क करा।

सुमेद फुलझेले.

माझं नाव हर्ष / सुमेद फुलझेले आहे आणि मी एक स्वतंत्र व्यवसायी आहे। या ब्लॉगच्या माध्यमातून मी माझ्या सर्व मित्रमंडळींना कमी भांडवलात व कमी वेळेत कसा नवीन व्यवसाय सुरू करावा आणि कशाप्रकारे नवीन व्यवसाय स्थापित करून आपण समृद्ध व्हावे या संदर्भात माहिती देण्याचे प्रयत्न करतोय। कुठे मी चुकू पण शकतोय तर कुठे तुमच्या अनमोल प्रतिसादाची मदत मला होईल ,अशा सकारात्मक विचारातून मी माझ्या ब्लॉगवर आपले विचार मांडतोय। या आशेने की तुम्ही मला योग्य तो सल्ला व मार्गदर्शन करून माझी या नव्या मार्गावर मला पाठींबा द्याल.


माझे काही व्यवसाय😌

  • mysumed माय सुमेद क्रियेशन.
  • सुनविमला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज.
  • सर्वश्री बहुउद्देशीय सामाजिक संस्था.

सोशल मीडिया


वरील लेख कसा वाटला यावर नक्की प्रतिक्रिया द्यावी। लाँकडाऊन संपल्यानंतर जे माझ्या लेखावर प्रतिक्रिया देतील व संपर्कात राहतील त्यांना नक्कीच प्रथम प्राधान्य देणार। तर मिञांनो घरी रहा। संपर्कात रहा मी सुमेद /हर्ष फुलझेले आपल्याला सतत मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.
📱 988188-4412 📱 70388-64412 📱 77569-64412 📱 90282-64412

Comments

Unknown said…
Nice information