MIDC क्षेत्रातील प्लॉट चे महत्त्व !

My Sumed | Too Good

MIDC क्षेत्रातील प्लॉट चे महत्त्व !

Welcome to the blog of MySumed.com

MIDC क्षेत्रातील प्लॉट चे महत्त्व !

कोणत्याही व्यवसायात प्रगती करायची असेल आणि मोठे उद्योजक व्हायचे असेल तर MIDC क्षेत्रात फॅक्टरी घालावी असे म्हटले जाते। कारण कोणत्याही व्यवसायाला 24 तास विज ( Electricity) आणि पाणीपुरवठा व ट्रान्सपोर्ट ची सुविधा अती आवश्यक असते आणि MIDC क्षेत्रात सरकार वाजवी दरात उपलब्ध करून देते शिवाय कर्जा करीता विशेष सहकार्य करते।महाराष्ट्रातील एम.आय.डी.सी. मधे प्लाट घेवून ज्याना बीजनेस किंवा कम्पनी टाकायची असेल ,त्यानी ज्यांच्या नावावर प्लाट घ्यायचा असेल त्या सुशिक्षित बेरोजगार मूल आणि मूली तसेच पुरुष आणि महिला त्यांची डिजिटल सिग्निचर आणि ते सुरु करीत असलेल्या कम्पनी चा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार ठेवावा. (आवश्यक कागदपत्रे आम्ही तयार करून देतो) हे प्लाट सरकारी नोकरी करीत असलेल्या महिला आणि पुरुष याना मिळत नाहीत.हे प्लाट सरकार विकते. हे प्लाट एकदा खरेदी केल्या नंतर आणि कम्पनी सुरु केल्या नंतर 95 वर्ष आपल्या ताब्यात असतात,एकदाच MIDC क्षेत्रात प्लॉट घेऊन पुर्ण 2 पीढ्या व्यवसाय करून स्वताच्या कुळाचा उद्धार करु शकतात .पण प्लाट खरेदी केल्या नंतर 3 वर्षाच्या आत जर त्या प्लाट मधे कम्पनी सुरु केलि नाही तर हे प्लाट सरकार परत घेते आणि आपन प्लाट साठी सरकारला दिलेले पैसे सरकार आपल्याला परत देते.हे प्लाट विकताना कोणीही एजेंट मध्यस्थि नसतो ,तसेच प्लॉटची होणारी सम्पूर्ण रक्कम ही ज्या ज्या वेळी एम.आय.डी.सी.ऑफिस चे पत्र आपल्याला येतील त्या प्रमाणे 6 महिन्याच्या कालावधि मधे 3 भागात सरकारच्या अकाउंट ला बैंक च्या डी .डी .च्या स्वरुपात भरायचे असतात .ही रक्कम एकत्र भरावी लागत नाही.हे प्लाट विक्री साठी सरकार लवकरच ऑनलाइन अर्ज सुरु करीत आहे .ऑनलाइन अर्ज भरताना प्लाट घेणाराची डिजिटल सिग्निचर आणि तो व्यक्ति टाकत असलेल्या कम्पनीचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आणि प्लाट च्या एकूण होणाऱ्या रकमेच्या 5% रक्कम तयार पाहिजे.हे प्लाट सरकारला ज्या किमतित विकायचे आहेत त्या कीमती सरकार ने दिनांक:07-01-2016 पासून ठरवून दिलेल्या आहेत.

एम.आय.डी.सी. तिल प्लाट घेणेंचि प्रोसीजर कशी असते आणि नंतर आपल्या कम्पनी चे लोन कसे मंजूर करावे ते लोन मंजूर करण्याची प्रोसीजर कशी असते ते मी या मेसेज द्वारे सर्वाना मोफत मार्गदर्शन करतो शिवाय कोणत्याही व्यवसायाचे प्रशिक्षण आणि सर्टीफिकेट पण देतो .ह्या प्लॉटची सम्पूर्ण रक्कम ही कोणत्याही माणसाच्या हातात द्यायची नसते .ही रक्कम सरकारच्या अकाउंट ला बैंक च्या डी .डी .द्वारे आपल्याला भरायची असते. प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या एम.आय.डी.सी. च्या कीमती काय आहेत ती यादी मी सोबत देत आहे .हे प्लाट च्या कीमती मी स्क्वेयर फुट प्रमाणे देत आहे. ज्याना काही अधिक माहिती पाहिजे असल्यास त्यानी मला फोन करुण विचारावे .ही माहिति मी सेवाभावी विचाराने महाराष्ट्रातील जनतेला माहिती साठी देत आहे...आणि विशेष म्हणजे प्लाट बुक करायला आणि कंपनी साठी लागनारे कागदपत्रे आम्ही मुबलक दरात संपूर्ण महाराष्ट्र करीता तयार करून देतो।

ज्यांना एमआयडीसी मध्ये प्लॉट घेऊन कम्पनी टाकायची असेल त्यांच्या साठी ही माहिती आहे:- एमआयडीसी ऑफिस ने खालील एमआयडीसी मध्ये लिलाव पद्धतीने प्लॉट विक्री सुरू केली आहे. हे प्लॉट घेणे साठी तुम्ही जी कम्पनी टाकत आहे त्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट,आधार कार्ड ,पॅन कार्ड आणि Class-2 मध्ये डिजिटल सिग्निचर आवश्यक आहे, ही सिग्निचर सी.ए. तयार करून देतात.आणि प्लॉट घेणे साठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो हे ऑनलाइन अर्ज करण्याची दिनांक 23.03.2020 ते 16.04.2020 पर्यंत आहे.
ज्या एमआयडीसी चे प्लॉट विक्री सुरू झाले त्या बद्दल ची माहिती ची पीडीएफ च्या रुपात खाली दिलेली आहे.

पी डी एफ फाईल मध्ये कॉलम नंबर 5 मध्ये प्लॉट नंबर दिलेले आहेत.* कॉलम नंबर 6 मध्ये प्लॉट चा एरिया स्क्वेअर मीटर मध्ये दिले आहे.* कॉलम नंबर 7 मध्ये प्लॉट चे रेट म्हणजे स्क्वेअर मीटर प्रमाणे किंमत दिली आहे.एमआयडीसी प्लॉट ची किंमत ही स्क्वेअर मीटर मध्ये घेते स्क्वेअर फूट मध्ये घेत नाही.आणि प्लॉट चे आकार स्क्वेअर मीटर मध्ये दिले आहेत हे आकार स्क्वेअर फूट मध्ये काढायचे असतील तर दिलेल्या प्लॉट च्या एरियाला X 10.76 ने गुणायचे म्हणजे प्लॉट आकार स्क्वेअर फूट मध्ये येईल उदा:-प्लॉट चा एरिया 1000 स्क्वेअर मीटर आहे,तर 1000 स्क्वेअर मीटर ला 10.76 ने गुणायचे = स्क्वेअर फूट मध्ये प्लॉट चा आकार येईल.म्हणजे 1000 x 10.76= 10760 फूट प्लॉट चा एरिया येईल.पण एमआयडीसी प्लॉट ची किंमत ही स्क्वेअर मीटर च्या रेट प्रमाणे घेते, स्क्वेअर फूट च्या रेट प्रमाणे पैसे घेत नाही हे लक्षात घ्या.

  कॉलम नंबर 8 मध्ये प्लॉट च्या किमतीच्या 5% रक्कम ऑनलाइन फॉर्म भरताना एमआयडीसी कडे भरावी लागेल. ती रक्कम दिलेली आहे.
  कॉलम नंबर 9 मध्ये प्लॉट ची एकूण किंमत दिलेली आहे त्या किमतीच्या 5% रक्कम आणि 2,360/- रुपये प्रोसिडिंग फी आपल्याला प्लॉट साठी ऑनलाइन अर्ज करताना एमआयडीसी कडे भरावी लागेल.
  कॉलम नम्बर 9 मध्ये दिलेल्या प्लॉट च्या एकूण किमती पेक्षा जी व्यक्ती जास्त किमत देऊन तो प्लॉट घेईल त्यांनाच हे प्लॉट मिळणार आहेत.
    अधिक मार्गदर्शना साठी PDF file पहा आणि एम आय डि सी कार्यालयाशी सम्पर्क करा.
महाराष्ट्रातील MIDC क्षेत्रात उपलब्ध प्लॅाटचे भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून संपूर्ण PDF डाऊनलोड करावे.

           

वरील लेख कसा वाटला यावर नक्की प्रतिक्रिया द्यावी। लाँक आउट संपल्यानंतर जे माझ्या लेखावर प्रतिक्रिया देतील व संपर्कात राहतील त्यांना नक्कीच प्रथम प्राधान्य देणार। तर मिञांनो घरी रहा। संपर्कात रहा मी सुमेद /हर्ष फुलझेले आपल्याला सतत मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.
📱 988188-4412 📱 70388-64412 📱 77569-64412 📱 90282-64412

Comments

Rikkey said…
Thanks for valuable information. ��
Thank you very much for your feedback
Thank you very much for your feedback
Unknown said…
Thank you very much
Unknown said…
Thank you very much
Ashish Sontakke said…
Great information, thank You Sir
Sachin said…
Very good information Sumed Sir. Please plot chi booking suru zali tar nakki kalva. Thanks.